Executive Producer
प्राजक्ता धर्माधिकारी - मराठी वाहिनी 'झी युवा'च्या Executive producer (कार्यकारी निर्माता). सुरुवातीपासूनच स्वतःच्या सगळ्या आवडी-निवडी जपत पत्रकारिते पासून कार्यकारी निर्माती होण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास.
By: Team catalyst
आपले महत्वकांक्षी स्वप्न पूर्ण करून जिद्दीने स्वतःच्या आवडी-निवडी जपणारी ही पत्रकार. मुंबईच्या चंदेरी दुनियेत जाऊन एका TV channel ची कार्यकारी निर्माती होण्यापर्यंतचा तिचा हा प्रवास.
झी युवा च्या Executive Producer , ABP माझा वर सूत्रसंचालक, कसा होता हा प्रवास?
सगळ्यात आधी तर खूप छान थिम आहे तुमची ह्या वर्षी. तुमच्या सारख्या तरुणांसोबत संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. मी १५ वर्षांपूर्वी कॉलेज सोडलं. मी विचार करते कि तुम्ही सध्याचे तरुण, तुम्ही कधी विचार पण नसेल केला ऑनलाइन अभ्यासाचा. पण तरी इतकी छान संकल्पना घेऊन तुम्ही काम करता आहेत. खरंच हे खूप कौतुकाचं काम आहे. माझ्या बद्दल सांगायचं तर, लहानपणापासूनच आपल्याला काही गोष्टींची आवड असते. तसेच लहानपणापासून नृत्य, नाटक या गोष्टींकडे माझा ओढा होता. मी भरतनाट्यम सुद्धा शाळेत असताना शिकले. औरंगाबाद मध्ये सूर्यकांत सराफ सरांच्या नाट्य शिबीरांमुळे माझ्या सगळ्या आवडी-निवडींना आकार यायला लागला. मग मी विचार करत गेले आणि माझ्या असं लक्षात आलं कि माझ्या स्वभावाला पत्रकारिता हे कदाचित उत्तम असेल. म्हणून औरंगाबाद मध्ये माझं MA मराठी पूर्ण झाल्या नंतर पुण्याच्या रानडे इन्स्टिटयूट मध्ये मी जर्नलिझम ला प्रवेश घेतला. तो एक वर्षाचा डिप्लोमा होता, तो पूर्ण केला आणि मग त्याच्यानंतर २००९ ला ABP मध्ये जॉईन झाले आणि तिथून माझा सगळा प्रवास सुरु झाला. मला खूप चांगल्या माणसां बरोबर काम करण्याची संधी लाभली. 'ABP माझा'चे संपादक राजीव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी खूप काही शिकले. तिथे मी बाहेर पडून रिपोर्टींग केलं. निवडणुकीच्या काळातला तो माहोल, बाहेर काय वातावरण असतं,न्यूझ रूम मध्ये काय माहोल असतो, ते सगळं आता सुद्धा मिस करते मी. ABP सोडलं म्हणजे आता काहीतरी नवीन केलं पाहिजे. आणि मला माझी आवड, नाटक, नृत्य ह्या संबंधित काहीतरी करायचं होतं. एक संधी माझ्यासाठी चालून आली. झी युवा मध्ये executive producer म्हणून मी जॉईन झाले. आणि तिथला अनुभव माझ्या साठी ABP पेक्षाही खूप छान आहे. मी खरच खूप भाग्यवान आहे कि मला खूप चांगली माणसं मिळाली आणि चांगले अनुभव मिळाले आणि तेच काम मी करत आहे जे काम करून मला आनंद मिळतो.
Executive Producer आत्ता आणि आधी ABP माझा वर सूत्रसंचालक, ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टीआहे आणि अवघड पण. जर तुम्हाला विचारला कि तुमचा आवडता प्रवास कोणता किंवा दोघान मध्येकाय फरक, तर काय सांगता येईल तुम्हाला?
आवडता पार्ट असं नाही सांगता येणार पण ABP मध्ये जे मी काम केलं, ते पहिलं काम होतं. सतत तुम्हाला on toes असावं लागायचं, कधीही लाईव्ह जावं लागेल, कोणाशी बोलावं लागेल. माझ्या चॅट कॉर्नर नावाच्या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटी शी बोलणं, कधी लाईव्ह, कधी प्री रेकॉर्डेड, लाईव्ह करतांनाच्या वेगळ्या गोष्टी, सध्या मी ते लाईव्ह जाणे, जसं तू आता माझ्याशी बोलती आहे ते खूप जास्त मिस करते. पण आत्ता मी जे काम करतीये, त्यातली सगळ्यात जास्त मला आवडणारी गोष्ट म्हणजे मला गोष्ट बनवता येते, मला पात्र घडवता येतात.लोकांचे मनोरंजन करता येते. मी आत्ता जो शो करतीये ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण, तर तो बघतांना जेव्हा ४ लोकं हसतात, तेव्हा समाधान मिळतं, कि अरे! इतकं तणावपूर्ण आयुष्य जगत असतांना जर आपल्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर हास्य येत असेल, तर ते एक समाधान वेगळंच आहे. तर, ह्या दोन्ही गोष्टींची तुलना करू शकत नाही म्हणून मला असं वाटतं कि त्या दोन्ही त्यांच्या त्यांच्या जागी योग्य आहेत.
Executive Producer असणं, म्हणजे तुमची दिनचर्या काय असते?
दिनचर्या म्हणजे असं काही वेगळं नसतं, मीटिंग होतात. ह्या मीटिंग मध्ये आम्ही स्क्रीनप्ले, पात्र, गोष्ट,यावरती चर्चा करतो आणि मग एक गोष्ट ठरते. मग तिच्यावर काम चालू होत. उदाहरणार्थ, जर तू एक पात्र असशील,तर तुझं काम काय असेल, काय पद्धती असतील,भाषा कशी असेल, कपडे कसे असतील, हे सगळं बघून त्यात अजून काय-काय करता येईल हा आम्ही विचार करतो. असं पात्रांवरती काम करणं आणि काम करता करता ती गोष्ट बनवणं हा सगळा प्रवास असतो. मालिकेच्या स्क्रीनप्ले वर काम करावे लागते, दिग्दर्शकाचं काम असतं, मग ते सेट वर शूट होतं, त्याचं नियंत्रण करायचं, दिग्दर्शक आणि आर्टिस्टशी बोलायचं. हे सगळं कार्यसंघ असतं आणि या टीमला बांधणारा असतो तो EP. तो सगळ्यांच म्हणणं ऐकतो आणि सगळ्यांपर्यंत नीट विचार पोहोचवतो. हे सगळं झालं कि एडिटिंग असते, त्याच्यात कधी कधी वेळ द्यावा लागतो. तर हे सगळं काही ठराविक नसतं. एपिसोड प्रदर्शित होण्याआधी आमच्याकडे येतो, तो नीट झाला का हे बघायचं असतं आणि अभिप्राय द्यायचा असतो. हे असं काहीसं काम असता आमचं. २४/७ काम असतं पण ते आवडीचं असल्यामुळे स्ट्रेस येत नाही, आणि मज्जा येते काम करायला.
फिल्म इंडस्ट्री वर ह्या पँडेमिक चा काय प्रभाव होता? आणि तुम्हाला काय वाटतं की ते फिल्म इंडस्ट्री ने कसं फेस केलं पाहिजे किंवा कसं फेस केलंय ?
खूप चांगल्या पद्धतीने हाताळल.ज्यांचं हातावर पोट आहे, त्यांच्या साठी झी सारखी मोठी संस्था असेल किंवा मोठमोठ्या प्रोडक्शननी, सगळ्यांनी वेगवेगळया पद्धतीने लॉकडाऊन काळामध्ये काम केलं. त्यांच्यापर्यंत अन्न धान्य पोहोचवणं असेल,त्यांच्यासाठी पैसे पोहोचवणं असेल ,त्यांच्या कुटुंबा साठी काही करणं असेल हे सगळं या काळामध्ये केलं. पण मग साधारण मे मधे लक्षात आलं कि हि परिस्थिती काही लवकर सुधरणार नाहीये . मग तेंव्हा ऑनलाईन टेकनोलॉजि चा वापर करून काही वेगळ्या पद्धतीने सामग्री निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले. या काळामध्ये घरामध्ये बसूनच सर्व कलाकारांनी लोकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. आपण कायम म्हणतो की” इच्छा असेल तेथे मार्ग असतो”.तर ती इच्छा फिल्म इंडस्ट्री मधे दिसून आली आणि सगळे एक झाले. मला तर वाटतं उगीचच म्हणतात असं की मराठी माणूस एकमेकांचे पाय खेचतो, बिलकुल असं नाहीये. प्रत्येकाने स्वतःहून पुढे येऊन, पुढाकार घेऊन यात काम केलंय. ह्या काळामध्ये लोकांना योग्य तो उपचार मिळण्यासाठी कलाकारांनी सर्वतोपरी मदत केली.
आपण मराठी फिल्म इंडस्ट्री व मराठी टेलिव्हिजन बद्दल काय सांगणार? मागच्या ५-६ वर्ष्यात मराठी चित्रपट जास्त तयार होत आहेत आणि त्यांचा कन्टेन्ट ही खूप वेगळा आणि चांगला होतो आहे. प्रेक्षकांचाही दृष्टिकोन आता बदलत आहे, ह्या बद्दल तुमचे काय मत आहे?
अरे खूप चांगली गोष्ट आहे. मराठी प्रेक्षकांना सर्व प्रकारच्या, सर्व भाषेच्या फिल्म बघायला आवडतात. साऊथ मध्ये तेथील प्रेक्षक त्यांच्या भाषेच्या फिल्म पाहण्यास प्राधान्य देतात. ह्याच इंडस्ट्री मध्ये लोक उभे राहायला लागले ,लोक निर्मिती करायला लागले, ज्याला शासनाचा सुद्धा खूप चांगला पाठिंबा आहे . शासना कडून पाठिंबा मिळतोय, आर्थिक मदत मिळत आहे. आपल्या मातीतले विषय घेऊन films बनत आहेत. सैराट हे त्यांचे खूप मोठ उदाहरण आहे. लोकांना त्यांच्या आवडीचं दिलं तर ते नक्की पुन्हा एकदा थिएटर कडे वळतील. वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं, काही जुनी नाटकं पुन्हा एकदा नव्याने मांडली जात आहेत, ती पण लोकांना आवडू लागली आहे. मराठी टेलिव्हिजन वरती चॅनेल ची संख्या वाढत आहे .त्यामुळे आता वाढत स्कोप आहे.आत्ताच आनंदी गोपाळ ह्या फिल्म ला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. आपल्याकडे गुणवत्ता आहे, बुद्धिमत्ता आहे. येत्या काळात तुमच्यासारखे उत्तम शिक्षण घेतलेले तरुण मुलं चांगले कलाकार म्हणून इंडस्ट्री मध्ये आहेत आणि ते हिंदी मध्ये देखील तेवढाच जम बसवत आहेत ही सुद्धा कौतुकाची बाब आहे.
तुमचा आवडता चित्रपट कोणता?
मला गमती-जमती चे चित्रपट जास्त आवडतात. 'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट मला खूप आवडतो, मी तो कधीही, कुठेही, केव्हाही बघू शकते.
जर्नालिझम एक विस्तृत क्षेत्र आहे. त्यात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टी आहे. जर्नालिझम हा समाजाचा आरसा आहे, त्याने लोक प्रभावित होतात. सध्याच्या जर्नालिझम बद्दल तुमचे काय मत आहे.
प्रत्येक क्षेत्रालाच सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही गोष्टी असतात. पत्रकारीता हे समाजात ज्या गोष्टी घडतात त्याचं प्रतीक आहे, कारण जे घडतंय हे त्याच्याबद्दलच रिपोर्टींग होत राहणार आणि त्याच बातम्या आपल्याला पाहायला मिळतील. मला असं वाटतं की आपण समाज म्हणून किती प्रगल्भ आहोत हे जर्नालिझम आपल्याला दाखवतो. जर ती पत्रकारिता एवढी प्रगल्भ नाहीये तर ह्याचा अर्थ आपण समाज म्हणून कुठेतरी कमी पडतोय. जर नकारात्मक बातम्या सारख्या येत असतील म्हणजे समाजा मध्ये तेवढी निगेटिव्हिटी आहे. पण कोरोना काळात आपण बघितलं की एकीकडे आपण हे जरी सतत दाखवत असलो कि सध्याची परिस्थिती वाईट आहे तरीसुद्धा पॉझिटिव्हिटी पण होती. लोक एकमेकांसाठी उभे राहिले. या गोष्टी सुद्धा दाखवल्या गेल्या. पण पॉझिटिव्ह गोष्टी दाखवण्याचा प्रमाण आणि नेगेटिव्ह बातम्या दाखवण्याच्या प्रमाण याच्यात निश्चित तफावत आहे . पण ती होईल हळू हळू कमी.आणि मग जर समाजामध्ये काही निगेटिव्ह राहीलंच नाही तर जर्नालिझम मधे कुठून निगेटिव्हिटी येणार? तर आपण आपल्या पासून सुरुवात करायला हवी असं मला वाटतं. आपण सतत फ्रॉड बातम्या बघत असतो. मग त्याचा TRP मोजला जातो. मग लोकांना हेच बघायला आवडतं असं एक समज होतो. आणि त्याच बातम्या सतत दाखवल्या जातात. एखादी चांगली बातमी माझ्याकडे आली, मी वाचली आणि मी 50 लोकांना पाठवली असे होत नाही. पण एखाद्या फ्रॉड चं कळलं काही की लगेच मी दहा जणांना पाठवेल. म्हणून आपण आपल्या पासून सुरुवात करूयात आणि याचे फरक असे लगेच नाही दिसत. वेळ जातो. पण आपण करायला सुरुवात केली तर होऊ शकतं.
तुम्ही सुरवातीला म्हटले की तुम्ही पण औरंगाबाद चे आहेत. “City of Gates” पासून “City of Dreams” पर्यंत च्या ह्या प्रवासात तुम्ही औरंगाबाद ची कोणती गोष्ट खूप मिस करता?
मी औरंगाबाद मधे टू-व्हिलर वर फिरायचे,ते मी मुंबईत खूप मिस करते. असं म्हणतात की मुंबई खूप सुरक्षित आहे,आणि खरच मुंबईसारखी सिटी नाही. पण मी तितकीच सुरक्षित औरंगाबाद मधे पण होते. खरं तर माझ्या आयुष्याचा पाया औरंगाबादमधे बांधला गेला आहे. माझी शाळा शारदा मंदिर, तिथे मला शिक्षण आणि संस्कार मिळाले. शिक्षकांनी मला शिकवलेल्या बारीक सारीक गोष्टी, वेळेचं महत्त्व, ज्या आज आठवल्या की त्याचं महत्त्व कळतं. औरंगाबाद हे कायमच मनात असणार आहे.आणि माझे आई-बाबा तिथेच असतात त्यामुळे मी वर्षातून एकदा तरी औरंगाबाद ला येतेच.
जर तुम्हाला आता निवड करता आली कि तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता आणि करिअर ठरवू शकता, तर तुम्ही हे क्षेत्र निवडाल का काही वेगळ?
नाही मी हेच क्षेत्र निवडेल. मला खूप आवडतं माझं फील्ड. त्याच्यामुळे मी दुसरा काही विचार सुद्धा करू नाही शकत.म्हणजे दोन्ही-पत्रकारिता सुद्धा आणि मी आत्ता काम करत असलेली क्रीएटिव्ह फील्ड सुद्धा. ह्या दोन्ही गोष्टी मला प्रचंड आवडतात. परत मला झिरो पासून जरी सुरु करायचं असेल,तर मी म्हणेन की या दोन्ही पैकी एक कुठलंही मी निवडेल. यापेक्षा दुसरा विचार मी करू शकत नाही.
जर आमच्या प्रेक्षकां पैकी कोणाला ह्या क्षेत्रा मधे यायचं असेल तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल?
सल्ला म्हणजे फिल्म इंडस्ट्री मधे यायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं वाचन करणं गरजेचं आहे. मग फक्त गोष्टीची पुस्तकं किंवा मोठमोठ्या कादंबऱ्या वाचा असे नाही तर सगळ्या पद्धतीचे वाचन असले पाहिजे. आत्ता सध्या अवतीभवती काय चाललेलं आहे याची सतत जाणीव ठेवत जा. त्याचा उपयोग तुम्हाला इकडे क्रीएटिव्ह आणि पत्रकारिता मधे पण होणार आहे. आणि जर खरच ह्या फील्ड मधे जायचं असेल तर याचं बरोबर शिक्षण घ्या. खूप चांगल्या चांगल्या युनिव्हर्सिटी मधे खूप चांगले कोर्सेस आहेत. मला एवढच म्हणायचं आहे की आपण शाळेत आपल्याला आधी A,B,C,D शिकवलं आणि नंतर आपण त्याचे शब्द बनवायला लागलो. तर ह्याचं सुद्धा रीतसर शिक्षण घ्या, त्यानंतर मग तुम्हाला स्वतःला घडवायचं असतं.
Credits
Team CATALYST
Interviews have a way of making others' experiences feel like our own. These interviews are brought to you by Team Catalyst!